सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मार्च 2019 (10:49 IST)

मुख्यमंत्री आज मातोश्रीवर जाणार

युती झाल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेच्या अनेक खासदारांना कार्यकर्त्यांच्या असंतोष पसरला आहे. जागा वाटपाचातिढा सोडवण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अर्थात गुरूवारी मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. 
 
अनेक विद्यमान शिवसेना खासदारांविरोधातला असंतोष उफाळून आला आहे. याचा परिणाम लोकसभा निकालांवर होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच आता ते मातोश्रीवर जाऊन उध्दव यांच्याशी चर्चा करणार आहेत. युतीनंतर भाजपा 25 आणि शिवसेना 23 जागांवर लढणार आहे. अनेक जागांवर अजूनही कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालेले नाही. जालन्याच्या जागेसाठी अर्जुन खोतकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. या दोघांमधला संघर्ष विकोपाला गेला आहे. यावरही चर्चा होणार आहे.