1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019 (17:35 IST)

भारत हा कमजोर नसून, जगातील मजबूत सैन्य आणि देशांमध्ये भारत हा एक देश - मुख्यमंत्री

chief minister
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला आपल्या  सैन्याने दिलेले चोख प्रत्युत्तर ही अभिमानाची बाब असून, सैन्य व वायू दलाने पाकव्याप्त काश्मिरमधील जैश- ए- मोहम्मदच्या तळांवर बॉम्बींग (air strike) करून ते नेस्तनाबुत केले, जगातील मजबूत सैन्य, देशापैकी भारत एक देश असल्याचे सैन्याने सिद्ध केले आहे. या यशस्वी कामगिरीकरिता महाराष्ट्राच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्य आणि वायू दलाचे अभिनंदन केले आहे. 
 
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्य आणि वायुदलाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता. त्यावेळी मुख्यमंत्री संबोधित करत होते. ठरावास सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले आहेत की आपल्या देशाच्या सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात दहशतवादांच्या तळावर केलेली कारवाई ही भारतासाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. पुलवामा येथील हल्ल्यात शहिदांचे बलीदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी केंद्र शासनाने सैन्यास संपूर्ण अधिकार दिले.तर भारत हा कमजोर नसून, जगातील मजबूत सैन्य आणि देशांमध्ये भारत हा एक देश आहे. भारतीय म्हणून ही सर्वांसाठी गौरवाची बाब आहे.” यावेळी त्यांनी सैन्य आणि वायू दलाचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या आहेत.