1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (09:39 IST)

आगामी निवडणूक भाजापासाठी नसून भारतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजापाच्या कार्यक्रमातून आगामी निवडणुकांचे तयारी सुरु केली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना असे म्हटले की येणारी भाजापासाठी नसून भारतासाठी आहे, येणारे  2019 ची निवडणूक ही मोठी संधी असून, भारताचं भविष्य व भवितव्य ठरविण्याची ही निवडणूक असणार असे  फडणवीस यांनी म्हटले.
 
ते पुढे म्हणाले की आगामी 2019 ची निवडणूक माझ्यासाठी वेगळी असणार आहे, कारण हा येणारा कालखंड भारत घडवणार  आहे. आपला देश 2020 साली जगातील सर्वात तरुण देश  असणार असून, 2020 साली जपानचं सरासरी वय 48 असणार आहे. तर ईस्टर्न युरोपचं 44 असेल, वेस्टर्न युरोपचं 41 असेल, चीनचं 39 असेल, अमेरिकेचं 37 वर्षे असेल. त्यावेळी भारतचं सरासरी वय 27 वर्षे असणार आहे. त्यामुळे तारुण्यानं सळसळत्या या देशात, भारत मानव संसाधन म्हणून उपयोगात आणलाच  पाहिजे. जगाच्या पाठीवर अशा प्रकारचा डेमोक्रॅटीक अॅडव्हान्टेज युरोपला मिळाला, त्यावेळी त्यांची प्रगती केली आहे. जेव्हा चीनला मिळाला तेव्हा चीनची प्रगती झाली. त्यामुळे एबीजी अब्दुल कलामसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण 2020 मध्ये ही उडाण घेऊ शकणार आहोत. 2020 ते 2035 पर्यंतचा काळ भारतासाठी 'करो या मरो' असा असणार आहे.