सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 29 जानेवारी 2019 (16:03 IST)

बलेनोचा नवा अवतार भारतात लाँच, किंमत 5.4 लाखांपासून सुरू

मारुती सुझुकीने प्रिमियम हॅचबॅक बलेनोचा नवा अवतार लाँच केला आहे. 2019 मारुती बलेनोची एक्स शोरूम किंमत 5.4 लाखांपासून ते 8.77लाख रुपयांच्या दरम्यान आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवी बलेनो आकाराने दिसायला अधिक मोठी दिसते. बलेनोच्या अंतर्गत आणि बाह्य सजावटीमध्ये आकर्षक बदल पाहायला मिळतील. फेसलिफ्ट बलेनोमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने नवीन फीचर्सचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
 
आमचे मुख्य लक्ष ग्राहक आहेत. या नव्या बलेनोसह ब्रँडची ओळख आणखी वाढणार असल्याचे मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (मार्केटिंग आणि सेल्स) आर.एस. कलसी यांनी सांगितले. प्रिमियम हॅचबॅक प्रकारात बलेनो आमच्यासाठी खूपच यशस्वी मॉडेल असल्याचेही ते म्हणाले. अलीकडेच बलेनोने फक्त 38 महिन्यात पाच लाखांच्या विक्रीचा विक्रम  केला आहे.
 
नवीन मारुती बलेनोमध्ये नवीन फ्रंट बंपर, थ्रीडी डिझाइनची ग्रील आणि डे टाइम रनिंग लाइट्‌ससह एलइडी प्रोजेक्टर हेडलाइट्‌स देण्यात आल्या आहेत. फेसलिफ्ट बलेनोमध्ये नवे ड्युअलटोन 16 इंच अलॉय व्हील्स आहेत. नवी बलेनो दोन नव्या रंगात, फिनिक्स रेड आणि मॅग्मा ग्रे सादर करण्यात आली आहे. 
 
अंतर्गत सजावटीबाबत सांगायचे झाले तर यात ड्युअल टोन काळा, निळ्या रंगाची अंतर्गत सजावट आणि 7 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट यंत्रणेसह नवीन स्मार्ट प्ले स्टुडिओ देण्यात आला आहे. हा स्मार्ट प्ले स्टुडिओ हार्मनसह अद्यावत करण्यात आला आहे. यात अँड्रॉइड ऑटो, अ‍ॅपल कारप्ले, वॉयर्स रेकग्रिशन फंक्शन आणि लाइव्ह ट्रॅफिक   आणि व्हेइकल इन्फर्मेशनसह नेव्हिगेशन सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. टचस्क्रीन रिव्हर्स पार्किंग कॅमेरा डिस्प्लेच्या रूपातही काम  करतो.