मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (19:17 IST)

'पहारेकरी चोर है' म्हणणारेच चोरांचे साथीदार झाले : भुजबळ

chhagan bhujbal
शिवसेना भाजप युती म्हणजे 'पहारेकरी चोर है' म्हणणारेच चोरांचे साथीदार झाले असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. गेल्या दोन दिवसांपासून विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उदघाटनासाठी ते येवला दौऱ्यावर आहे. आज त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
 
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी म्हणजे मोठा घोटाळा आहे असे म्हणणारी शिवसेना आज भाजप सोबत बसली आहे. तर वाघाचे दात मोजून घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वाघाचे मुके घेतांना दिसत आहे.स्वतःला विरोधात म्हणून घेणारी शिवसेना ही सत्तेतील भागीदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.