शनिवार, 8 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑगस्ट 2025 (21:29 IST)

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची15 हजार पोलिसांच्या भरतीला मान्यता

Maharashtra Government
गेल्या काही महिन्यांपासून नौकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची15 हजार पोलिसांच्या भरतीला मान्यता  देण्यात आली आहे. एकाच वेळी 15 हजार पोलिसांच्या भरतीला मंजुरी मिळाल्याने तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 
या निर्णयामुळे अलिकडच्या काही महिन्यांत प्रक्रियेत वारंवार होणाऱ्या विलंबामुळे चिंतेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीमुळे, भरती प्रक्रिया आता वेगाने पुढे जाण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने 15 हजार पोलिसांच्या भरतीव्यतिरिक्त मंत्रिमंडळाच्या इतर प्रमुख निर्णयांसह ही माहिती पोस्ट केली.
यापूर्वी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13,560 रिक्त पोलिस पदे भरण्याची घोषणा केली होती. जूनमध्ये पोलिस महासंचालकांनी सांगितले होते की सुमारे 10 हजार पदे भरली जातील. शारीरिक चाचणी 15सप्टेंबर रोजी होणार आहे.
Edited By - Priya Dixit