1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 एप्रिल 2019 (07:44 IST)

बॅंकाना सुट्टी, करा कामांचे नियोजन

Vacation in Bangkok
एप्रिलमध्ये नेहमीप्रमाणे बैसाखी, राम नवमी, गुड फ्रायडे आणि महावीर जयंतीची बॅंकाना सुट्टी असणार आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बॅंका आधीच बंद असतात. 
 
महिन्याच्या पहिल्या शनिवारी म्हणजेच 6 एप्रिलला गुढी पाडवा असल्याने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि गुजरातमध्ये बॅंका बंद असतील. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी नेहमीप्रमाणे बॅंका बंद राहतील. दुसरा शनिवार 13 आणि चौथा शनिवार 27 एप्रिलला येत आहे. म्हणजेच एप्रिलमध्ये 20 एप्रिलला शनिवारी बॅंका खुल्ल्या राहतील. 
 
एप्रिल 13 आणि 14 एप्रिलला दुसऱ्या शनिवारी आणि रविवार असल्याने बॅंक बंद राहतील. या दोन्ही दिवशी आंबेडकर जयंती आणि बैसाखी देखील येतेय. या दोन्ही सुट्ट्या शनिवार आणि रविवारी असल्याने बॅंकांची सुट्टी कमी होईल. 17 एप्रिल (बुधवारी) महावीर जयंती असल्या कारणाने अधिकतर राज्यांमध्ये बॅंकाना सुट्टी राहील. याच्या एक दिवसानंतर 19 एप्रिलला गुड फ्रायडेमुळे बॅंक बंद राहतील.