सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात

पुण्यातील प्रसिद्ध असलेली  कॉसमॉस बँकेवर २०१८ साली झालेल्या हल्ल्यामागे उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात उघड झाला आहे. राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तपास अहवालात हे उघड झालं आहे. कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ला अतिशय प्रगत, पूर्वनियोजित, योग्य समन्वय करत करण्यात आला होता. ज्यामध्ये बचावाचे तीन मुख्य स्तर भेदण्यात आले असे अहवालात म्हटले आहे.

कॉसमॉस बँक सायबर हल्ल्यानंतर सात महिन्यांनी हा अहवाल मिळाला आहे. कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील सर्व्हरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा दरोडा घातला होता,  पुणे पोलिसांनी ९ आरोपींविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात १७०० पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  सायबर गुन्हे शाखेकडून विशेष न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल केले आहे.  ११ व १३ ऑगस्ट रोजी कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरसारख्या पॉक्सी सर्व्हरद्वारे जगभरातील २८ देशांतून तसेच भारतातील विविध शहरांमधून क्लोन केलेल्या व्हिसा कार्ड व रुपे कार्डद्वारे ९४ कोटी ४२ लाख रुपये काढून दरोडा घातला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले होते़ या तपास पथकाने कोल्हापूर येथे तपास केल्यावर या गुन्ह्यातील एटीएममधून पैसे काढणाऱ्यांचा छडा लागला होता.