धक्कादायक! 9 वर्षाच्या शाळकरी विद्यार्थ्याचा वर्गात शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार
यवतमाळच्या बाभुळगावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अवघ्या 9 वर्षाच्या तिसरीत शिकणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्याने त्याच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका दुसऱ्यामुलीच्या मदतीने मुलाने हे गंभीर कृत्य मुलीला शौचालयात नेऊन केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षांची मुलगी आणि दोन्ही आरोपी विद्यार्थी बाभूळगाव जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत आहेत. ही घृणास्पद घटना या महिन्याच्या पहिल्या तारखेला घडली. ज्या विद्यार्थ्यांना हा गुन्हा केला आहे त्यांना बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे.
घटनेच्या काही दिवसांनंतर पीडित मुलीने तिच्या पालकांना सांगितले की तिला तिच्या गुप्तांगात वेदना होत आहेत. पीडितेच्या पालकांनी तिला रुग्णालयात नेले तेव्हा ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी सांगितले की डॉक्टरांनी तिच्या गुप्तांगांना दुखापत झाल्याचे सांगितले. या घटनेने शाळेसह संपूर्ण परिसर हादरला आहे.
या प्रकरणात पीडित मुलीच्या आईने 9 ऑगस्ट रोजी आरोपी मुला आणि मुलीच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपींवर भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण पॉक्सो कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपी मुलाला आणि त्याला साथ देणाऱ्या 9 वर्षाच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात पाठवणी करण्यात आली आहे.
Edited By - Priya Dixit