रोजगार देणे तर दूरच, असलेले रोजगार काढून घेण्याचे काम सुरू आहे –जयंत पाटील
पंचेचाळीस वर्षांत घडले नाही ते आज मोदी सरकारच्या काळात घडत आहे. रोजगार देणे तर दूरच पण असलेले रोजगार काढून घेण्याचे काम मोदी सरकार करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. देशात वर्षाला दोन कोटी रोजगार येण्यासाठी हे सरकार गुंतवणुकीत अपयशी ठरले आहे. विकासाच्या नावाखाली अनेक युवक अजूनही बेरोजगार आहेत. बेरोजगारीचा खरा चेहरा लपवण्यासाठी अहवाल प्रकाशित करण्यासाठी या सरकारने मज्जाव केला होता.भाजपाने देशवासीयांना विकासाची गाजरे दाखवली आणि देशाचा जपान करण्याच्या नादात नेपाळ करून ठेवला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. राहुल गांधींच्या ‘चौकीदार चोर है’या वाक्याला जनतेचा जोरदार प्रतिसाद मिळाला. त्याला प्रत्युत्तर देण्याच्या नादात पंतप्रधान मोदींनी सर्वांनाच चौकीदाराची भूमिका दिली आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.