गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2019 (16:35 IST)

अखेरीस व्हाट्सएपचा इनवाइट फीचर आला

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हाट्सएपने बुधवार सांगितले की आता वापरकर्ता स्वत: निश्चित करू शकतील की ते कोणत्या ग्रुपमध्ये सामील होऊ इच्छित आहे आणि कोणत्यात नाही. लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन अॅपने हा पाऊल उचलला आहे, कारण की सामान्य निवडणूक कॅंपेनमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक महत्त्वाची भूमिका बजावतात. एखाद्या ग्रुपमध्ये कोणालाही जोडण्यापूर्वी त्याला त्या व्यक्तीची परवानगी घ्यावी लागेल आणि यासाठी एक इनवाइट पाठवविणे आवश्यक आहे. या फीचरची तपासणी आधीपासूनच चालू होती आणि आता हे लॉन्च केलं गेलं आहे.
 
यासाठी व्हाट्सएपने सेटिंग्जमध्ये नवीन पर्याय सामील केला आहे, जे इनवाइट सिस्टम अंतर्गत येईल. यामुळे, वापरकर्ते स्वतः हे ठरवू शकतील की त्यांना त्यांच्या परवानगीशिवाय सामील केलं किंवा नाही. यासाठी वापरकर्त्याला 'settings' पर्यायावर जावे लागेल. यानंतर त्यात प्रायवेसीच्या आत तीन पर्याय मिळतील -nobody, my contacts, आणि everyone. तीन दिवसांत जर इनवाइट नाही स्वीकारलं तर ते आपोआप संपेल.
 
कंपनी म्हणाली की या फीचर्सची सुरुवात बुधवार पासून केली आहे. ते म्हणाले की येणाऱ्या आठवड्यांत हे फीचर जगभरात उपलब्ध होईल.