शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2019 (16:15 IST)

टीकटॉक (TikTok) प्रेमिनो तुमचे आवडते चायनीज अॅप बंद होणार

सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालणारे आणि फारच : कमी काळात लोकप्रिय ठरलेले चायनीज अॅप टीकटॉक (TikTok) ला मोठा धक्का बसला आहे. यामध्ये मद्रास उच्च न्यायालयाने सरकारला टीकटॉकवर बंदी आणण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच हे बंद होणार अशी चिन्हे आहेत. त्यामुळे अॅप प्रेमीना मोठा धक्का बसणार आहे.
 
चीनचे हे अ‍ॅप असून यामध्ये आक्षेपार्ह व्हिडिओंना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप ठेवला आहे. मद्रास उच्च न्यायालयात टीकटॉक विरोधात एक याचिक दाखल केली आहे. या याचिकेत असे म्हटले आहे  की,मुले जी या अ‍ॅपचा वापर करतात, ती यौन उत्पिडनसंबंधी व्यक्तींच्या संपर्कात आरामात येऊ शकतात. या प्रकारचे अनेक व्हिडिओ TikTokवर व्हायरल झाले असून, ही गंभीर बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. यानंतर न्यायालयाने आक्षेपार्ह व्हिडिओंमुळे TikTok चा वापर करणे धोक्यापेक्षा कमी नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता कोर्टाचा निर्णय आल्याने हे अॅप बंद होणार आहे. युजर आपले छोटे-छोटे व्हिडिओ बनवून शेअर करू शकतात. भारतात हे अ‍ॅप खूपच लोकप्रिय झाले आहे. या अ‍ॅपद्वारे बॉलिवूडचे डायलॉग, जोक्सवर युजर व्हिडिओ बनवितात. तसेच लिप-सिंकसह लोकप्रिय संगितावर डान्सचेही व्हिडिओ टाकले जातात. हे अॅप चीनी कंपनीने बनविले असून सुरक्षा आणि इतर देखील मोठी कारणे मागे असणार आहे. त्यामुळे आता सोशल मिडीयावर आपले व्हिडियो टाकून करमणूक करणारे चेहेत यांना मोठा धक्का बसला आहे.