बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

आपल्या लाडक्या मुलीसाठी पॉलिसी, दररोज 121 रुपयांची बचत, मिळतील 27 लाख रुपये

आपल्या लाडक्या मुलीची लग्न खूप थाटामाटात करण्याची इच्छा प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असतं. त्यांच्या या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी जीवन विमा निगम (LIC) ची कन्यादान पॉलिसी चांगली भेट ठरेल. या अंतर्गत आपण दररोज केवळ 121 रुपये जमा करून 27 लाख रुपये जमा करू शकता. जाणून घ्या या पॉलिसीबद्दल-
 
एलआयसीची कन्यादान पॉलिसी जगात पहिलं असं कन्यादान प्लान आहे ज्यात दुर्दैवाने पॉलिसी घेणार्‍याचा मृत्यू झाल्यास प्रीमियर भरण्याची गरज नाही. वरून दररवर्षी अभ्यासासाठी एक लाख रुपये खर्च देण्यात येईल. या व्यतिरिक्त 25 वर्ष पूर्ण झाल्यावर पॉलिसीच्या नॉमिनीला कन्यादानाचा पूर्ण पैसा देण्यात येईल. वडिलांचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला तात्काळ 10 लाख रुपये आणि अपघातात मृत्यू झाल्यास 20 लाख रुपये रक्कम देण्यात येईल.
 
पॉलिसी अंतर्गत आपण दररोज 121 रुपयांची बचत केल्यास आपल्याला 25 वर्षांनंतर 27 लाख रुपये मिळतील. दररोज 121 रुपये म्हणजे एका महिन्याला एकूण 3600 रुपये भरावे लागतील. आपल्याला 27 लाख रुपयांची रक्कम 25 वर्षांनंतर मिळेल पण पॉलिसी अंतर्गत प्रिमियम आपल्याला केवळ 22 वर्षांपर्यंतच भरायची आहे.
 
ही पॉलिसी घेण्यासाठी उपभोक्ताचे वय 30 किंवा त्याहून अधिक असणे गरजेचे आहे. तसेच मुलीचं वय किमान एक वर्ष असणे गरजेचे आहे.
 
यातील खास बाब म्हणजे आपण आपल्या सोयीप्रमाणे कमी किंवा जास्त प्रिमियम प्लान देखील करवू शकता. या पॉलिसी बद्दल इतर महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला एलआयसीच्या वेबसाइटवर मिळेल.