शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

भारत भ्रमणासाठी ‘भारत दर्शन’ स्पेशल ट्रेन

‘भारत दर्शन’ अंतर्गत IRCTCनं पर्यटन स्पेशल ट्रेन सुरू केली आहे. त्यामध्ये ९,९०० रुपयांमध्ये  काही राज्यांमध्ये फिरता येणार आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे. दहा दिवसांमध्ये तीन राज्यांतील पर्यटन क्षेत्राला भेटी देता येतील. १२ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान हा प्रवास असेल. भारत दर्शनची सुरूवात झारखंडमधील जसीडीहपासून यात्रेला सुरूवात होणार आहे. शिर्डी, त्रंबकेश्वर, द्वारका, सोमनाथ, उज्जेन आणि ओमकारेश्वर येथे भेट देता येणार आहे. प्रवाशी असन्सोल, पुरूलीया, टाटानगर आणि झारसुगुडामधून ट्रेन पडकू किंवा सोडू शकतात.
 
भारत दर्शन स्पेशल ट्रेन (EZBD31) १२ ऑगस्ट रोजी जसीडीहमधूल सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी रवाना होईल. हा पूर्ण प्रवास दहा रात्री आणि ११ दिवस असणार असून त्याचे तिकीट ९,९०० रूपये आहे. यामध्ये तीन वेळचं शाकाहारी जेवण आणि नाश्ताच्या समावेश आहे. प्रवशांना रेल्वेचं स्लीपर क्लासचे तिकीट आणि राहण्यासाठीही नॉन एसी रूमची सुविधा असणार आहे.