शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

कर्ज आणखी स्वस्त होणार, रेपो दरात कपात

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. या निर्णयामुळे रेपो दर 5.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो दरात कपात झाल्यामुळे आता कर्ज आणखी स्वस्त होणार.
 
याव्यतिरिक्त आरबीआयने ऑनलाईन व्यवहारावरील NEFT आणि RTGS चार्जेस हटवण्याचा निर्णय घेतला. 
 
आरबीआयने सलग तिसऱ्यांदा रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली. यामुळे 6 टक्के असणारा रेपो दर आता 5.75 टक्के इतका राहणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे आता बँकांकडून मिळणारे कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. कर्जावरील व्याजदर कमी झाल्याचा नागरिकांना मोठा फायदा होईल. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज यांसारखेंचे हप्ते कमी होतील.