शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 1 मे 2019 (12:13 IST)

SBI: आजपासून सुरू करण्यात येईल ही खास सर्विस, लाखो लोकांना मिळेल फायदा

देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (SBI)च्या ग्राहकांना आज अर्थात 1 पासून बरेच नवीन फायदे मिळणार आहे. एसबीआयने सेविंग्ह अकाउंट आणि होम-ऑटो लोनवर लागणारे व्याजच्या पद्धतीत बदल केला आहे. एसबीआय जमा बचत खात्यांचे दर आणि लोन वर लागणारे व्याज दरांना भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)च्या रेपो रेटशी लिंक्ड केले आहे. अर्थात आरबीआयचे रेपो रेट कमी केल्यानंतर एसबीआय बँक लगेचच आपली व्याज दर कमी करून देईल. हे कदाचित 1 मे पासून प्रभावी होऊ शकते. एसबीआय असे करणारे पहिलेच बँक आहे ज्याने आपले डिपॉझिट (जमा दर) आणि कमी वेळेच्या लोनवर व्याज दर आरबीआयच्या रेपो रेटशी जोडण्याचा ऍलन केला आहे.
 
रिझर्व्ह बँकने मौद्रिक समीक्षेच्या बैठकीत रेपो रेट 0.25 बेसिस प्वाइंटने कमी करून 6 टक्के केला आहे. एसबीआयने कमी वेळेचे लोन, एक लाख रुपयांपेक्षा अधिक डिपॉझिट, एक लाख रुपयांपेक्षा अधिक सर्व कॅश क्रेडिट अकाउंट्स आणि ओवरड्राफ्टला रेपो दराने जोडले आहे.
 
आरबीआयने आपल्या पॉलिसीत हे नियम बदलण्याचा निर्णय घेतला होता. एसबीआयच्या पाउलामुळे आरबीआय रेपो रेटमध्ये केलेली कमी किंवा वाढ  करण्याची प्रक्रिया लवकरच शक्य होईल. बँक आतापर्यंत आरबीआयच्या दरात कपातीचा फायदा ग्राहकांना लगेचच देत नव्हते ज्यामुळे आरबीआय ने बर्‍याच वेळा नराजगी दर्शवली होती.