1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 20 एप्रिल 2019 (16:51 IST)

खासगी सावकाराने पतीच्या कर्ज वसुलीसाठी त्याच्या पत्नीवर केला बलात्कार

कोल्हापूर येथे संतापजन प्रकार घडला आहे. पैशाच्या वसुलीसाठी सावकाराने इंजिनिअर असलेल्या नवविवाहितेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप आहे. इतकंच नाही तर मारहाण करुन; सिगारेटचे चटके देऊन ब्लॅकमेलही केल्याचा आरोप आहे. धमकी देत सावकाराने या नवविवाहितेवर बलात्कार केल्याचं प्रकरण समोर येते आहे. पतीच्या व्यवसायासाठी घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या व्याजापोटी अश्लिल व्हिडीओ क्लीप तयार करुन ती यूट्यूबर व्हायरल करण्याची धमकी देवून विवाहीतेवर सामुहीक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा नराधमांवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 
 
संशयित हरीश स्वामी (२२, दत्त मंदिर जवळ, रुईकर कॉलनी, कोल्हापूर), आशिष पाटील (२८, रा. सायबर चौक, राजारामपुरी), सदाम मुल्ला (२९, यादवनगर, कोल्हापूर), अशी त्यांची नावे आहेत. पोलीसांनी शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास तिघांच्याही घरी धाड टाकून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते पसार झाले आहेत. मोबाईल बंद असल्याने त्यांचे लोकेशन मिळून येत नाही. त्यामुळे कोल्हापूर मध्ये नागरिक संतापले आहेत. धक्कादायक म्हणजे नवविवाहित ही इंजिनिअर आहे.तक्रारदार महिलेचा वर्षभरापूर्वी प्रेमविवाह झाला होता. मूळचे पुण्याचे असलेले हे दाम्पत्य कोल्हापुरात राहण्यास आले होते. दारू पिऊन कर्जाची परतफेडीऐवजी शरीरसुखाची मागणी करत, सावकाराने महिलेवर दारु पिऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे.