शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

SBI ने ATM हून पैसे काढण्याचे नियम बदलले

भारतीय स्टेट बँकेने आपल्या कोट्या ग्राहकांसाठी एटीएमने पैसे काढण्याचे नियम बदलले आहे. हे सर्व प्रकारच्या डेबिट कार्डावर लागू होईल.
 
* चार प्रकारचे डेबिट कार्ड जारी केले जातात - 
एसबीआय ग्राहकांसाठी चार प्रकारचे डेबिट कार्ड जारी करते. यात क्लासिक, ग्लोबल इंटरनॅशनल, गोल्ड इंटरनॅशनल आणि प्लॅटिनम इंटरनॅशनल डेबिट कार्ड सामिल आहे. हे डेबिट कार्डे जारी करण्यासाठी बँक काही शुल्क आकारते.
 
* आता दैनिक मर्यादा ही आहे - 
क्लासिक डेबिट कार्ड धारक एटीएममधून दररोज 20 हजार रुपये काढू शकतात. ग्लोबल इंटरनॅशनल डेबिट कार्ड धारक दररोज 40 हजार रुपये काढू शकतात. बॅंक बहुतेक ग्राहकांना हे दोन कार्डच जारी करते.
 
* हे आहे वार्षिक शुल्क - 
क्लासिक डेबिट कार्डवर बँक 125 रुपये (जीएसटी अतिरिक्त) वार्षिक शुल्क देखील आकारते. त्याच वेळी कार्ड हरवल्यावर 300 रुपये (जीएसटी अतिरिक्त) आकारते. इंटरनॅशनल डेबिट कार्डवर 175
रुपये, प्लॅटिनम डेबिट कार्डवर 175 रुपये आणि प्रीमियम व्यवसाय कार्डवर 350 रुपये शुल्क घेते.
 
* योनो अॅपच्या सहाय्याने काढता येईल पैसा -
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आपल्या ग्राहकांना होळीच्या खास प्रसंगी मोठी भेट देताना नवीन सुविधा प्रदान केली आहे, ज्या अंतर्गत एसबीआय ग्राहक एटीएम कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू शकतात. एसबीआयने आपल्या या नवीन सेवेचे नाव योनो कॅश (YONO Cash) ठेवले आहे. तर मग चला जाणून घेऊ या एसबीआयचे योनो कॅश फीचर कसे कार्य करेल? आणि एटीएम शिवाय आपण पैसे कसे काढू शकता?
 
आपल्याला 6-अंकी योनो पिन सेट करावा लागेल. यानंतर एटीएम कार्डाशिवाय पैसे काढायचे असल्यास तर यासाठी आपल्याला योनो अॅपला रिक्वेस्ट पाठवावी लागेल. यानंतर आपल्या मोबाइलवर एक मेसेज येईल ज्यामध्ये 6-अंकी पिन मिळेल. या पिनच्या मदतीने जवळपासच्या कोणत्याही एटीएमवरून आपण पैसे काढू शकता. लक्षात ठेवा की या पिनची वैधता 30 मिनिटे आहे म्हणजे पिन येण्यास 30 मिनिटांनंतर ते एक्सपायर होईल आणि आपण पैसे काढू शकणार नाही.