शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

बँक दररोज आपल्या खात्यात टाकेल 100 रुपये, जाणून घ्या RBI चा नियम

वर्तमानात देखील बँक ग्राहकांना अनेक प्रकाराच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. बँकेद्वारे सतत केले जात असलेल्या प्रयत्नांनंतर देखील ग्राहकांना अनेक प्रश्न पडतात. अनेकदा ग्राहक एटीएमहून पैसे काढण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याच्या खात्यातून पैसे तर निघून जातात परंतू एटीएमहून कॅश मिळत नाही. आपल्यासोबत देखील असे घडत असेल तर भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) द्वारे तयार हा नियम आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 
 
आरबीआयने असे प्रकरण सोडवण्यासाठी एक नियम काढला आहे. या नियमानुसार आपली रक्कम खात्यात येत नाही तोपर्यंत बँकेला आपल्याला दररोज भरपाई म्हणून 100 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. 
 
आरबीआयने या संदर्भात एक वेळ मर्यादा निर्धारित केलेली आहे. मे 2011 मध्ये आरबीआयकडून जारी निर्देशानुसार, अशी तक्रार मिळत्याक्षणापासून सात दिवसात बँकेला रक्कम ग्राहकाच्या खात्यात वापस टाकवी लागेल.
 
बँकेकडून पेनल्टी मिळवण्यासाठी आपल्याला ट्रांजेक्शन फेल झाल्याच्या 30 दिवसात ट्रांजेक्शन पर्ची किंवा अकाउंट स्टेटमेंट सह तक्रार नोंदवावी लागेल. यानंतर आपल्याला बँकेच्या अधिकृत कर्मचार्‍याला आपल्या एटीएम कार्डची माहिती द्यावी लागेल. सात दिवसात पैसा परत आला नाही तर आपल्याला एक फॉर्म भरावा लागेल, फॉर्म भरल्यावर आपली पेनल्टी सुरू होऊन जाईल.