मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2019 (16:19 IST)

भारतात EON उत्पादन बंद, Santro झाली हुंडईची सर्वात स्वस्त कार

हुंडई इयॉन आवडणार्‍यांसाठी वाईट बातमी आहे. हुंडईने इयॉन हैचबॅक बंद केली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवरून देखील त्याची माहिती काढून टाकली आहे. आता हुंडई सेंट्रो कंपनीची भारतातील सर्वात स्वस्त आणि लहान कार आहे. हुंडई इयॉन नवीन सेफ्टी नियमांच्या अनुरूप अपडेटेड नव्हती, म्हणून कंपनीने ते बंद करण्याचा निर्णय घेतला. नवीन नियमांतर्गत कारच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये ड्राइव्हर एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), रियर पार्किंग सेन्सर, स्पीड लिमिटर आणि सीटबेल्ट रिमाइंडर अशा फीचर अनिवार्यपणे असावे.
 
हुंडईने भारतात नवीन सेंट्रो लॉचं केल्याबरोबर इयॉनचा उत्पादन प्रतिबंधित केलं. सेंट्रो लॉचं करण्यापूर्वी इयॉनला प्रत्येक महिन्यात सुमारे 4400 युनिट्स विक्री मिळत होती. सेंट्रो हॅचबॅकचे लॉचं झाल्यापासून आतापर्यंत इयॉनच्या फक्त केवळ सहा युनिट्स विकल्या गेल्या. हुंडई इयॉनमध्ये 0.8 लीटर आणि 1.0 लीटर दोन पेट्रोल इंजिनाचे पर्याय ठेवण्यात आले होते. 0.8 लीटर इंजिनाची पावर 56 पीएस आणि टॉर्क 74.5 एनएम आहे. त्याचवेळी, 1.0 लीटर इंजिन 69 पीएस पावर आणि 91 एनएम टॉर्क देत. दोन्ही इंजिन्स 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी कनेक्ट होते.
 
हुंडईने सध्या याबद्दल माहिती नाही दिली आहे की ती इयॉनच्या जागी इतर कार आणेल किंवा नाही. इयॉन बंद केल्यानंतर सध्या सेंट्रो हॅचबॅक ही हुंडईची सर्वात स्वस्त आणि लहान कार आहे.