शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 20 फेब्रुवारी 2019 (09:11 IST)

अजय देवगणचा हा चित्रपट का झाला बंद?

अजय देवगण हा खूप बिझी कलाकार आहे. त्याचा टोटल धमाल हा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्याशिवाय तो महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट तानाजीमध्येही बिझी आहे. रणबीर कपूरबरोबर तो आणखी एक चित्रपटही सुरू करणार आहे. दे दे प्यार दे चे शूटिंग संपलेले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, तो एस. एस. राजामौली यांचा चित्रपट आर. आर. आर. मध्येही कॅमियो करताना दिसून येणार आहे. 
 
अजयला घेऊन एक स्पोट्‌र्स ड्रामादेखील सुरू होणार आहे, ज्याध्ये तो इंडियन फुटबॉल टीमचा मॅनेजर सैयद अब्दुल रहीमच्या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहे. बधाई हो सारखा सुपरहिट चित्रपट बनवणारे अमित शर्मा हा चित्रपट बनवणार आहेत. अजयला घेऊन गेल्या वर्षी कॅप्सूल गिल नावाच्या चित्रपटाची घोषणा देखील करण्यात आली होती, जो जसवंत सिंग गिल यांचा बायोपिक होता. 1989 मध्ये गिल यांनी रानीगंज(पश्मि बंगाल)मध्ये कोळशाच्या खाणीत अडकलेल्या 65 लोकांचा जीव वाचवला होता. ते बोअरहोलद्वारे आत गेले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन टीनू सुरेश देसाई करणार होते, परंतु घोषणेशिवाय हा चित्रपट पुढे सरकू शकलेला नाही, परंतु आता हा चित्रपट बनत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. 
 
या चित्रपटाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की, अजय या चित्रपटाविषयी अत्यंत उत्साहित होता, परंतु अजयच्या अपेक्षेप्राणे स्क्रिप्ट बनू न शकल्याने अजयने हा चित्रपट बनवण्याचा विचार सोडून दिला.