सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

पुलवामा शहिदांच्या सन्मानार्थ अजय देवगणचा मोठा निर्णय, पाकमध्ये रिलीज नाही होणार 'टोटल धमाल'

14 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संताप पसरलेला आहे. एक सामान्य माणूस असो किंवा बॉलीवूड सेलेब्रिटी प्रत्येकजण त्याच्या विरोधात पुढे येत आहे आणि याच दरम्यान अजय देवगण यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अजय देवगण यांनी ट्विट केले, पुलवामा हल्ल्यानंतर असलं वातावरण बघत 'टोटल धमाल' चित्रपटाच्या टीमने निर्णय घेतला आहे की हे चित्रपट पाकिस्तानमध्ये रिलीज होणार नाही. 
 
अजय देवगणच्या ट्विट केल्याबरोबर त्यांच्या फॅन्सच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. अजयच्या या निर्णयाचं सगळे खूप कौतुक करत आहे.