सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 फेब्रुवारी 2019 (08:56 IST)

अजमेर दर्गा आता पाकिस्तानी साठी बंद

जम्मू काश्मीर पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 4२ जवान शहीद झाले असू, प्रत्येक नागरिक अस्वस्थ झाला आहे, संतापला असून तो उद्विग्न आहे. आता या भ्याड हल्ल्याचा बदला घ्या, पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करा, अशा तीव्र भावना व्यक्त होत असून, जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांना पोसणाऱ्या पाकिस्तानचाही काटा काढण्याची मागणी होत आहे. या भावना लक्षात घेऊन, केंद्र सरकारने ठोस पावलं उचलली असतानाच, राजस्थानातील अजमेर दर्ग्याची दारं पाकिस्तानी नागरिकांसाठी बंद करावीत, अशी सूचना दर्ग्याच्या प्रमुख दिवाणांनीच केली आहे. त्यामुळे आता पाकच्या नागरिकांना येथे दर्शन घेता येणार नाही. हल्ला हा इस्लामविरोधी आहे. त्यामुळे दरवर्षी पाकिस्तानातून अजमेर दर्ग्यात येणाऱ्या मुस्लिम यात्रेकरूंवर निर्बंध आणावेत, अशी मागणी सैय्यद जैन उल आबदिन यांनी केंद्राला केली आहे.  जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर बंदी आणावी, असंही त्यांनी नमूद केलं. सरआहे.