शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 एप्रिल 2019 (12:44 IST)

राज्यात एस टी ची स्लिपर शिवशाही सेवा बंद

एसटी महामंडळाने लोकांच्या विरोधात घेतला आहे. राज्यातील 27  खासगी स्लीपर शिवशाही बससेवा बंद करण्यात येणार असून, अॅडव्हान्स बुकिंग संपल्यावर लगेचच ही स्लीपर शिवशाही बंद करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा फटका बसणार असून सेवेला मुकणार आहेत. महामंडळला होणाऱ्या तोट्यामुळे ही स्लीपर शिवशाही सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. एप्रिल महिन्यातील ज्या शेवटच्या दिवसाचे आगाऊ आरक्षण (अॅडव्हान्स बुकिंग) झालेले असेल, त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून बुकिंग बंद करण्यात यावे, अशी सूचना एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. ऐन उन्हाळ्यात शिवशाहीची स्लीपर सेवा बंद झाल्याने प्रवासी नाराज झाले आहेत. राज्यातील विविध 42 मार्गावर एस.टी महामंडळातर्फे वातानुकूलित शिवशाही बससेवा सुरु करण्यात आली होती. यापैकी तब्बल 27 मार्गांवरील सेवा, तोट्यामुळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.सुरुवातीला चांगली बुकिंग झाली मात्र नंतर मात्र प्रवासी हवे तसे मिळत नसल्याने महामंडळाचे नुकसान होत होते त्यामुळे ही सेवा बंद करायचा निर्णय घेतला आहे.