शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

ATM मध्ये घुसुन उंदरांनी कुरतडले 12 लाख

आसाममध्ये उंदरानी नोटा कुरतडल्याचे विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथील तिनसुकीया येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये उंदरांनी चक्क १२ लाख 38 हजार रुपयांच्या नोटा कुरतडले आहेत. एटीएम 20 मे पासून बंद होते. एटीएम मशीन दुरुस्त करण्यासाठी बँकेचे कर्मचारी तिनसुकीया येथे गेले होते. मशीन उघडताच त्यांना धक्काच बसला. त्यांना मशीनमध्ये कुरतडलेल्या पैशांच्या ढिगारा दिसला असून त्यात उंदीर मनसोक्त फिरत होते. 
 
११ जून रोजी कुरतडलेल्या नोटांचा फोटो सोशल साईटवर व्हायरल झाला, त्यानंतर ही घटना समोर आली. ११ जूनला एटीएमची देखभाल करणारी कंपनी जीबीएस कर्मचारी तिथे गेले होते. तेव्हा १२ लाख ३८ हजार रूपयांच्या नोटा उंदरांनी कुरतडल्याचे व १७ लाख रुपयाच्या नोटा सुरक्षित असल्याचे त्यांना आढळले. कंपनीने १९ मे रोजी एटीएम मशीनमध्ये २० लाख रुपये टाकले होते.