रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 18 एप्रिल 2018 (15:34 IST)

बेळगावात नव्या, जुन्या नोटा जप्त, एकुण किंमत 7 कोटी

कर्नाटकातील बेळगावमध्ये पोलिसांनी नव्या 2 हजार व 5 रुपयांच्या नोटा तसंच जुन्या 1 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहे. या नोटांची एकुण किंमत 7 कोटी आहे. बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई करत नोटा जप्त केल्या तसंच याप्रकरणी एका व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे. 
 

कर्नाटकमध्ये येत्या १२ मे रोजी निवडणूक आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई महत्त्वाची मानली जाते आहे. तर  निवडणुकीचा निकाल १५ मे रोजी जाहीर होणार आहे. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण २२४ जागांसाठी मतदान होणार आहे. ४ कोटी ९६ लाख मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील.