मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आधार अपप्रचारा मागे गुगल, स्मार्ट कार्डची लॉबी

आधार ओळख पटवण्यासाठी एक सुलभ माध्यम म्हणून समोर येत असल्यामुळे गुगल आणि स्मार्ट कार्ड लॉबी आधारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा  आरोप यूआयडीएआयने (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया) केला आहे. आधारमुळे गुगल आणि स्मार्ट कार्ड हे व्यवसाया बाहेर पडतील, या भीतीने त्यांनी आधारबाबत अपप्रचार सुरू केल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
 
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता राकेश द्विवेदी यांनी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाला सांगितले की, युरोपमधील एका व्यावसायिक कंपनीने आधार कार्डचा वापर स्मार्ट कार्डप्रमाणे केला जाऊ नये म्हणून एक अभियान सुरू केले आहे. जर आधार यशस्वी झाले तर स्मार्ट कार्ड व्यवसायातून बाहेर होईल. त्यामुळे गुगल आणि स्मार्ट कार्ड लॉबीला आधार यशस्वी करायचे नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून आधारवर आरोप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.