1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

म्हणे, महाभारताच्या काळात इंटरनेट होते

national news
भारतात फार जुन्या काळापासून इंटरनेटचा वापर केला जातोय. महाभारताच्या काळात संजय दृष्टिहीन होता. परंतु युद्धाची सर्व हकीकत तो धृतराष्ट्रांना ऐकवत होता. हे इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीमुळेच शक्य झालं आहे, त्या काळात सॅटेलाइटही अस्तित्वात होत्या, असा अजब दावा  त्रिपुराचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी केला आहे.

आगरतळ्यातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही स्तुती केली. नरेंद्र मोदी देशातल्या डिजिटायझेशनला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळेच देशातील प्रत्येक व्यक्ती इंटरनेटच्या माध्यमातून जोडली गेली आहे. मोदी लोकांमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर वापरकर्ते म्हणूनही ओळखले जातात. भारतीय संस्कृती आणि परंपरा फार पूर्वापारपासून चालत आलेल्या आहेत. तेव्हापासूनच आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय, असं म्हणत त्यांनी इंटरनेट महाभारत काळापासून असल्याचे सांगितले.