रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 17 एप्रिल 2018 (12:38 IST)

भारतीय हवामान खात्याचा अंदाज

देशातल्या बळीराजाचे ज्याकडे डोळे लागले आहेत, तो मान्सून यंदा समाधानकारक होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सरासरीच्या 97 टक्के मान्सून होणार असा अंदाज हवामान खात्याचे महासंचालक के. जे. रमेश यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. तसेच देशावर यंदा दुष्काळाचे सावटही नसल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
 
नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत होतो. या पावसाविषयीचा प्राथमिक अंदाज दरवर्षी एप्रिलमध्ये भारतीय हवामान खात्याकडून जाहीर होत असतो. पावसाबाबतचा हा प्राथमिक अंदाज दिलासादायक आहे.
 
पावसाचा हा अंदाज हवामान विभागाकडे असलेल्या गेल्या 50 वर्षांतील नोंदींच्या आधारे काढला जातो.