बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 एप्रिल 2018 (16:53 IST)

प्लॅस्टिक बंदी; सरकारने पाण्याच्या बाटल्यांना वगळले

प्लॅस्टिक बंदीनंतर अवघ्या काही दिवसातच पहिला बदल करण्यात आला आहे. या बंदीतून पिण्याच्या पाण्यासह अन्य वापरासाठीच्या पीईटी बाटल्यांना मुक्त करण्याची राजपत्रित अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. 1 एप्रिलपासून राज्यभरात प्लास्टिक व थर्माकोल बंदी केली. त्यात प्लास्टिकच्या बाटल्यांचाही समावेश होता. या बाटल्या पीईटी व पीईटीई प्रकारच्या कच्च्या मालापासून बनविलेल्या असतात. यांचा उपयोग पाणी, खाद्यतेल, सरबते यांच्या साठवणुकीसाठी होतो. काही अटींच्या आधारे राज्य सरकारने बाटल्यांवरील बंदी मागे घेतली आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.