मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 एप्रिल 2018 (14:59 IST)

शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते भाजपच्या उपोषणात सहभागी

anant geete

भाजपचे खासदारांना पंतप्रधान मोदींनी केलेलं उपोषणाचं आवाहन केले असल्यामुळे देशभरात खासदार उपोषण करत आहेत. मात्र शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते भाजपच्या करोलबागच्या उपोषणात सहभागी झाले आणि एकच खळबळ उडाली. उपोषणाच्या मंचावर शिवसेनेचे खासदार अनंत गिते अवतरल्याचं पाहून थेट, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अनंत गिते यांना फोन करून तातडीनं मंचावरून उठण्याचे आदेश दिले. मुंबईतून पक्षप्रमुखांचं फर्मान आल्यावर गिते मंचावरून निघून गेले. पण त्याआधी अनंत गिते यांनी माध्यमांना मुलाखती दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आदेश आहेत. त्यामुळे त्याचे पालन करत असल्याचं अनंत गिते म्हणाले. एका बाजूला टोकाचा विरोध करून सरकारवर घणाघाती टीका करणारे उद्धव ठाकरे आणि सामना आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्र्यांचं भाजपच्या मंचावर रमणं यामुळे शिवसेनेची चांगलीच राजकीय भंबेरी उडाली .