1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 13 एप्रिल 2019 (15:57 IST)

Maruti Alto K10 मध्ये जुळले नवीन फीचर, किमतीत वाढ

maruti adds safety features
देशातील सर्वात मोठी कार निर्माता मारुती सुझुकी इंडिया (एमएसआय) ने गुरुवारी सांगितले की त्यांनी त्यांच्या हॅचबॅक कार Maruti Alto K10 मध्ये अनेक नवीन सुरक्षा फीचर जोडले आहे. यातून दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात मॉडेलची किंमत 23,000 रुपये वाढली आहे. मॉडेलमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ड्रायव्हर एअर बॅग, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, सीड अॅलर्ट सिस्टम, चालक आणि सहचालकाला सीट बेल्टाची आठवण करून देणारा रिमाइंडर देखील सामील केला आहे. 
 
एमएसआयने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत सांगितले की यामुळे Alto K10 मॉडेलच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किमतीत वाढ होईल. उद्योग सूत्रांनी सांगितले की दिल्ली-एनसीआरमध्ये विविध व्हेरिएंट्सच्या किमतीत 15,000-23,000 रुपयांनी वाढ झाली आहे. यासह विविध नवीन फीचरसह दिल्ली, एनसीआरमध्ये कारची किंमत 3.65 लाख ते 4.44 लाख रुपये आणि देशातील इतर भागात त्याची एक्स शोरूम किंमत 3.75 ते 4.54 लाख रुपये झाली आहे. गुरुवारापासून नवीन किमती लागू झाल्या आहे.