शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (09:32 IST)

विरोधकांन वर जोरदार टीका, जनता पुन्हा आम्हालाच संधी देणार - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला जनता पुन्हा आम्हालाच संधी देणार असा विश्वास व्यक्त केला आहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार टीका करत, 2023 मध्ये तुम्हाला पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणण्याची संधी मिळो असं सांगत मोदींनी अप्रत्यक्षपणे 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा सत्तेत येईल असं विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे. अहंकाराचा प्रभाव आहे की काँग्रेस 400 हन 40 वर आले आणि सेवभावाचा प्रभाव म्हणून आम्ही 2 हून 200 वर आलो असंही त्यांनी नमूद केले. 
महत्वाचे मुद्दे :
देशाची वायुसेना दुबळी व्हावी ही काँग्रेसची इच्छा असल्याचा गंभीर आरोप यावेळी नरेंद्र मोदींनी केला. 
काँग्रेस सरकारने आपल्या सैनिकांना बुलेटप्रूफ जॅकेट, चांगले हेल्मेट, चांगले बूटदेखील दिले नाहीत 
2016 साली आम्ही सैनिकांसाठी 50 हजार आणि 2017 मध्ये 1 लाख 86 हजार बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी केले अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली 
BC म्हणजे बिफोर काँग्रेस आणि AD आफ्टर डायनेस्टी असा टोलाही नरेंद्र मोदींनी यावेळी लगावला.  
भाजपावर टीका करता करताना देशाबद्दल वाईट बोलू नका असं यावेळी नरेंद्र मोदींनी विरोधकांना सांगितलं 
महाभेसळ असलेलं सरकार असते तेव्हा देशाची अधोगती होते असं सांगत नरेंद्र मोदींनी महागंठबधनवर टीका  
काँग्रेस प्रत्येक निवडणुकांच्या वेळी एकच जाहीरमाना प्रसिद्ध करत आलं आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेली वचनं आमचं सरकार आल्यावर आम्ही पूर्ण केली असं नरेंद्र मोदीं 
मची 55 वर्ष आणि माझे फक्त 55 महिने. मोदींकडे बोट करण्यापूर्वी आपला भूतकाळ तपासा असा टोला त्यांनी यावेळी लगावला.