मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 मे 2019 (17:07 IST)

सूर्य तापला, विदर्भातील सहा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

नागपूरमध्ये अंग भाजणाऱ्या उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच सूर्याची किरणे अंगाला चटके देत होती. दुपारी तर सूर्य आगच ओकतो की काय अशी अवस्था होती. त्यामुळे कमाल तापमान गेल्या २४ तासात १.४ डिग्रीने वाढत ४५.६ वर गेले होते. सामान्यत: तापमान तीन डिग्रीवर गेल्याने गर्मीने बेचेन केले होते. यावर्षी तापमानाने ४६.३ डिग्रीचा पल्ला गाठला आहे. मे महिन्यातील उरलेल्या दिवसात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी तापमान अचानक वाढले. हे लक्षात घेता हवामान खात्याने विदर्भातील सहा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. यात चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर, अकोला व गडचिरोलीचा समावेश आहे.