1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 मे 2019 (09:53 IST)

ऋतू प्रमाणे चोरटे करत होते चोऱ्या, चोरले दहा लाख रुपयांचे तब्बल ९० कुलर

wakad news
जसे  ऋतू बदलतील त्याच पार्श्वभूमीवर वेगळ्या प्रकारे चोऱ्या करणाऱ्या एका टोळीलाच  पोलिसांनी पकडले आहे. ही घटना पुणे येथे घडली आहे. या चोरांकडून  पोलिसांनी ८६ कुलर जप्त केले असून,  वाकड पोलिसांनी ही कारवाई केलीय. पोलिसांनी  योगेश बाबाजी पुतमाळी, अजीज बादशाह सय्यद, ज्ञानेश्वर रामराव पल्हाळ यांना पकडले आहे.  दरम्यान ही सर्व  चोरीची  घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या उन्हाळा तापला आहे. त्यामुळे थंड हवेसाठी ग्राहक  मोठ्या प्रमाणावर कुलर्सची मागणी करत आहेत.  याच दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील डिजीवन स्नेहांनजलीचे शोरूमचे गोडाऊन फोडून तब्बल ९० कुलर चोरले गेले. या प्रकरणी तीन जणांच्या टोळीला औरंगाबाद येथून पोलिसांनी पकडले आहे. या चोरांकडून  ८६ कुलर जप्त केले आहे. विशेष म्हणजे या सगळ्या कुलर्सची किंमत तब्बल १० लाख रुपये असून, संबंधित टोळीतील इसमावर पुणे ग्रामीण , औरंगाबाद येथे गुन्हे दाखल  आहेत. आरोपी योगेश, अजीज आणि ज्ञानेश्वर हे ऋतू बदलला की त्याचप्रमाणे चोरी करत. या चोरट्यांनी पावसाळ्यात छत्री, रेनकोट चोरले आहेत. सोबतच  शंभरपेक्षा अधिक लॅपटॉप चोरले होते. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. सदर  कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, गुन्हे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम कुदळ आणि प्रमोद कदम,हरीश माने यांच्या पथकाने केली.