1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

'हे' आहे आईवर बलात्कार करण्यामागेच कारण

son raped mother
लग्नासाठी स्थळ येत नाही म्हणून जन्मदात्या आईवरच बलात्कार केल्याचे साताऱ्यातील घटनेत उघड झाले आहे. आरोपी मुलाने दगडाने केलेल्या मारहाणीत वडीलही जखमी झाले.  याप्रकरणी भुईंज पोलिसांनी नराधम मुलाला अटक केली आहे. संदीप सूर्यवंशी असे त्या मुलाचे नाव आहे.
 
आई आणि वडिल एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी गावी गेले होते. तेथील गावदेव करुन झाल्यावर आरोपीची आई एकटीच घरी आली. यावेळी तिचा संशयित आरोपी मुलगा संदीप हा घराच्या ओट्यावर बसला होता. आई घरात गेल्यानंतर तो ही घरात गेला आणि त्याने आतून कढी लावली. यावेळी त्याने जबरदस्ती करत स्‍वत:च्या आईवरच बलात्कार केला.