1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 मे 2019 (16:52 IST)

मग दुष्काळ निवारणाची कामे का होत नाहीत ? राज ठाकरे

Raj Thackeray
सरकारसाठी इतर राज्य सरकारांच्या तुलनेत जास्त पैसा असतानाही दुष्काळ निवारणाची कामे का होत नाहीत, असा सवाल  मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांनी विचारला. दुसरीकडे मराठा आरक्षणावरून सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याची टीका राज यांनी केली. मराठा आरक्षण मिळाले म्हणून पेढे वाटणाऱ्यांना बोलवा आता असेही राज म्हणाले. स्थानिकाना प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरज भासणार  नाही, असेही त्यांनी नमूद केले. अभ्यास दौऱ्यांवर फुकटचा खर्च केला जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. 
 
दुष्काळाचा भीषण प्रश्न का निर्माण झाला? तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचार. जे चुकीचे सुरू आहे त्याबाबत बोलले पाहिजे अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. मोदी सरकारविरोधात मी बोलत आहे, कारण त्यांनी कामे केली नाहीत. स्वप्न दाखवून त्यांनी भ्रमनिरास केला. जर कामे केली नाहीत, तर कोणतेही सरकार असो त्याविरोधात बोलले पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले.