1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मे 2019 (09:59 IST)

राणे यांच्या आत्मचरित्रातून राज ठाकरेंबद्दल दोन मोठे खुलासे

disclosures
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ‘नो होल्डस बँरेड’ या आपल्या आत्मचरित्रातून राज ठाकरेंबद्दल दोन मोठे खुलासे केल्याचे समोर आले आहे. यात ज्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, त्यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्याशी संपर्क साधला होता. आपण एकत्र येऊन नवीन पक्ष स्थापन करु, असं निमंत्रण राज ठाकरेंनी आपल्याला दिलं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट नारायण राणे यांनी आत्मचरित्रात केला आहे.  सोबतच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, त्यावेळी हे 38 आमदारही पक्ष सोडणार होते. मात्र, प्रत्यक्षात 13 आमदारांनी सोडलं, असे नारायण राणेंनी आत्मचरित्रात म्हटले आहे.