मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2019 (18:00 IST)

शिवसेना सोडण्यामागचे कारण उलगडणार

खासदार नारायण राणे यांनी स्वत: एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आत्मचरित्र लिहित असलेल्या गोष्टीला दुजोरा दिला आहे. आपण आत्मचरित्र लिहित असून या आत्मचरित्रातून शिवसेना सोडण्यामागचे कारण उलगडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याआधी स्वाभिमान पक्षाचे नेते नितेश राणे यांनी आपले वडील आत्मचरित्र लिहित असल्याचे ट्विटरवर सांगितले होते.
 
नारायण राणे यांनी १९७२ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या काळात ते बाळासाहेब ठाकरेंच्या जवळच्या कार्यकर्त्यांपैकी एक होते. शिवसेनेतून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९९९ मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद देखील भूषवले. २००५ मध्ये शिवसेनेला रामराम ठोकला आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. परंतु, त्यांनी शिवसेना पक्ष का सोडला? हा मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर आता त्यांच्या आत्मचरित्रातून उलगडणार आहे.