शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (17:42 IST)

मनसे व काँग्रेस एकत्र आहेत का? तावडे यांचा सवाल

भाजप २७ एप्रिल रोजी मनसेच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणार असताना आता काँग्रेस का घाबरली आहे. मनसे व काँग्रेस एकत्र आहेत का असा थेट सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. भाजपने उद्या सभा घेतली तर आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी मिळणार नाही असा आक्षेप घेत काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पण जर तुमचे खरे असेल तर मग घाबरता कशाला? तुम्ही खोटे बोलता म्हणून तुम्ही घाबरता. त्यामुळेच तुमच्या खोटारडेपणाचा आम्ही पर्दाफाश करणार आहोत असेही तावडे यांनी सांगितले.