शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (17:38 IST)

राहुल गांधी यांच्या विमानाच्या इंजिनात बिघाड

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाच्या इंजिनात शुक्रवारी सकाळी पाटणाकडे जाताना बिघाड झाला. त्यामुळे राहुल यांना तातडीने दिल्लीला परतावे लागले. राहुल यांनी इंजिनातील बिघाडाबाबत ट्विटद्वारे माहिती दिली. या बिघाडामुळे बिहारमधील समस्तीपूर, महाराष्ट्रातील संगमनेर आणि ओदिशातील बालासोरमधील सभा उशिरा होणार असल्याने त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. या ट्विटसोबत त्यांनी विमानाच्या इंजिनात झालेल्या बिघाडाचा व्हडिओही अपलोड केला आहे. 
 
बिहारमधील समस्तीपूर, ओदिशातील बालासोर आणि महाराष्ट्रातील संगमनेर येथे प्रचार सभा होणार आहेत. सभेसाठी जात असताना पाटण्याजवळ त्यांच्या विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे संगमनेरसह बिहार आणि ओडिशातील सभा सुरू होण्यास विलंब होणार आहे, असे सांगून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच तांत्रिक बिघाडाचा कॉकपीटमधील व्हिडिओही त्यांनी अलपोड केला आहे.