1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (17:33 IST)

म्हणून मोदी यांनी रोड शो थांबवला

narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वाराणसीमध्ये सात किमीचा रोड शो केला, ज्यात लाखोंच्या संख्येने लोक जमले होते. पण या रोड शोमध्ये एका मुस्लीम वृद्धाने लक्ष वेधून घेतलं, ज्यांच्यासाठी मोदींनी लाखोंचा रोड शो थांबवला.
 
यावेळी मोदी जनतेला अभिवादन करत होते. त्याचवेळी एक वृद्ध मोदींना शाल देण्यासाठी प्रयत्न करत होता. या वृद्धाकडे मोदींची नजर गेली आणि त्यांनी सुरक्षा रक्षकाला सांगून ती शाल घेण्यासाठी सांगितलं. पण गर्दी प्रचंड असल्यामुळे गोंधळ उडाला. अखेर मोदींनी ती शाल फेकण्यासाठी सांगितलं. या व्यक्तीने शाल फेकली आणि सुरक्षा रक्षकांनी ती मोदींच्या हातात दिली. मोदींनीही ही शाल गळ्यात घातली आणि रोड शो पुढे सुरु केला.