1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 23 एप्रिल 2019 (18:38 IST)

म्हणून अजित पवार यांनी डोकावल

ajit pawar
बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मातोश्री मतदान करत होत्या. त्यावेळी अजित पवार हे त्यांच्याजवळ जाऊन मतदान कक्षात डोकावताना दिसले. त्यामुळे अजित पवार गोपनियतेचा भंग करत आहेत का असा प्रश्न पडला. पण अजित पवार यांच्या वृद्ध मातोश्रींनी मतदान यंत्र बंद असल्याचं सांगितलं. त्यामुळेच अजित पवार मतदान अधिकाऱ्यांना सांगून तिकडे गेल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. आई वृद्ध असल्याने अजित पवार तातडीने धावल्याचंही सांगितलं जात आहे.
 
दरम्यान, बारामतीच्या काटेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत अजित पवार यांनी कुटुंबासह मतदान केलं. बारामतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रतिभा पवार, रणजीत पवार, शुभांगी पवार यांनी मतदान केलं.