testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पाणीच नाही मग आम्ही मतदान करयच कुणाला - पुणेकरांचा गिरीश बापट यांना प्रश्न

girish bapat
Last Modified शनिवार, 20 एप्रिल 2019 (16:58 IST)
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचार आता अंतिम टप्प्यात असून, सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. सध्या छोट्या छोट्या सभा घेऊन उमेदवार नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हालाच मतदान करा असा, आग्रह करणाऱ्या उमेदवारांना आता नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र असून, याचा पहिला मोठा फटका पुण्यात भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना बसला आहे. मागील पाच वर्षे पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणारे पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना पुणेकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. बापट पुण्यातल्या कॅम्प परिसरात प्रचार करत होते, यावेळी जमलेल्या नागरिकांनी बापट यांना पाणी प्रश्नावरून चांगलंच घेरलं होते.

आम्ही पाण्यासाठी गेले कित्येक दिवस, महिने झगडतो आहोत अर्ज देत आहोत मात्र कोणतीच कारवाई होत नाही, आमच्या परिसरात आम्हाला पाणीच मिळत नाही, पुणे स्मार्ट शहर होतय तरी हे प्रश्न आहेत, मग
आता आम्ही मतदान का करावे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. परिसरामध्ये बापट पाणी पुरवू शकले नाहीत असा आरोप नागरिकांनी केला. तसेच, आता आम्हाला तर पाणीच मिळत नसेल तर आम्ही मतदान का करावे असा थेट प्रश्नच नागरिकांनी बापटांना तोंडावर विचारला आहे. नागरिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गिरीश बापट गोंधळून गेले होते. नागरिकांना नक्की काय उत्तर द्यावे असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी थातूरमातूर उत्तर देत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे येथे अनेक दिवसांपासून पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे, या आगोदर देखील अनेक प्रकारे पुण्यातील लोकांनी आपला राग व्यक्त केला आहे. मात्र आता निवडणुकीच्या तोडावर सुद्धा प्रश्न बाकी आहेत त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न मोठा मुद्द्दा होणार आहे.


यावर अधिक वाचा :

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर ...

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच
मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटिश संसद स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल ...

नारायण राणे अखेर भाजप मध्ये, पक्ष देखील केला विलीन

नारायण राणे अखेर भाजप मध्ये, पक्ष देखील केला विलीन
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण आणि कार्यकरत्यांचा भाजपा प्रवेश अखेर आज ...

विधानसभा निवडणूक: बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधलं स्मारक ...

विधानसभा निवडणूक: बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020पर्यंत पूर्ण होणार का?
"इंदू मिलच्या जागेवरचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण केलं जाईल. ...

काश्मीर : मोबाईल सेवा सुरू, पण नागरिकांमध्ये मात्र नाराजी, ...

काश्मीर : मोबाईल सेवा सुरू, पण नागरिकांमध्ये मात्र नाराजी, कारण...
काश्मीरमध्ये तब्बल अडीच महिन्यांनंतर सोमवारी दुपारी 12 वाजता मोबाईल सेवा सुरु करण्यात ...

व्होडाफोनची सर्वात खास ऑफर रोलआऊट, वापरकर्त्यांना 130GB ...

व्होडाफोनची सर्वात खास ऑफर रोलआऊट, वापरकर्त्यांना 130GB पेक्षा जास्त डेटा मिळेल
प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज योजनांसंदर्भात भारताच्या टेलिकॉम मार्केटमध्ये बरीच स्पर्धा ...

एमआयएम फॅक्टर औरंगाबादमध्ये यंदा चालणार का? : विधानसभा ...

एमआयएम फॅक्टर औरंगाबादमध्ये यंदा चालणार का? : विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या लक्षवेधी लढतींमध्ये औरंगाबादमधल्या लढती ...