बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 11 एप्रिल 2019 (09:24 IST)

पुण्यात राज यांची जाहीर सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची जाहीर सभा तोफ  येत्या १८ एप्रिलला पुण्यात सिंहगड रस्त्यावरील गोयल गंगा मैदानावर सायंकाळी ५ वाजता होणार आहे. पुण्यातील काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीसह मनसे कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज यांनी पुण्यात सभा घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. 
 
पुण्यात काँग्रेसचे मोहन जोशी व बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, मावळमधून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार व शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे लोकसभेच्या रिंगणात आहे्. त्यामुळे या सर्व लढतींच्या दृष्टीने राज ठाकरे यांची पुण्यातील सभा निर्णायक भूमिका बजावू शकते असा अंदाज आघाडीसह मनसे कार्यकर्त्यांचा आहे.