शुक्रवार, 9 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 9 एप्रिल 2019 (16:23 IST)

अजित पवारांनी केले राज यांचे कौतुक

ajit awar
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची दखल सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागली आहे, असे सांगत अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
 
शिरूर मतदार संघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि मावळ मतदार संघाचे उमेदावर पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, "राज ठाकरे सभा घेणार आहेत अशी ऐकीव माहिती आहे. आपल्या भाषणातून ते वस्तुस्थिती सांगत आहेत. त्यांची गुढीपाडव्याची सभा चर्चेत आहे. ते मोठा स्क्रिन लावतात आणि दाखले देऊन सभा घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी घेतली आहे असे सांगितले.