1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 एप्रिल 2019 (07:49 IST)

राज ठाकरे सहा ठिकाणी प्रचारसभा घेणार

Raj Thackeray
मनसे नेते राज ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करणार आहेत हेदेखील पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आपल्या आधीच्या दोन भाषणांमध्ये राज ठाकरेंनी मोदीमुक्त भारत हेच आमचे ध्येय आहे असे म्हटले आहे. अशात आता राज्यभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी राज ठाकरे सहा ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत असे समजते आहे.  
 
सोलापूर, नांदेड, मावळ यासह एकूण सहा ठिकाणी राज ठाकरे प्रचारसभा घेणार आहेत. या प्रचारसभा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या प्रचारासाठी असल्या तरीही त्यांचे उमेदवार मंचावर असणार नाहीत अस समजतय.