1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑगस्ट 2025 (15:40 IST)

अफगाणिस्तानात भीषण रस्ता अपघात, बस उलटल्याने २५ जणांचा मृत्यू

अफगाणिस्तान रस्ते अपघात
अफगाणिस्तानात एका रस्ते अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. काबूलच्या अर्घंडी भागात ही दुर्घटना घडली. हा दुर्दैवी बस अपघात अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे झाला. अशी माहीत समोर आली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये प्रवासी बस उलटल्याने किमान २५ जणांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी काबूलच्या अर्घंडी भागात घडली. बस दक्षिण अफगाणिस्तानातून हेलमंड आणि कंधार येथून प्रवाशांना घेऊन जात होती. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल मतीन कानी म्हणाले की, हा अपघात निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे झाला, ज्यामध्ये २७ जण जखमीही झाले.