मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 6 एप्रिल 2019 (08:34 IST)

काय होतास तू काय झालास तू! भाजपची राज ठाकरेंवर कार्टून मधून टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे व्यंगचित्रकार आहेत. त्यांनी मध्यंतरी व्यंगचित्रातून भाजप व मोदींवर जोरदार टीका केली आहे. लोकसभा निवडणूक जवळ येत असून आता सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. सोबतच अनेक नेतेमंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर निशाणा साधत आहेत. त्यामुळे करमणूक सुद्धा होते आहे. यामध्ये लोकसभा न लढवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत भाजपाने व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.  राज ठाकरे यांनी 2014 मध्ये भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रस- राष्ट्रवादीला पाडण्यासाठी साथ द्या अशा घोषणा दिल्या होत्या. मात्र, यंदाच्या म्हणजेच 2019च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ द्या, अशी साद घालत असल्याचे चित्र यामधून दाखवण्यात आले.काय होतास तू काय झालास तू! कार्यकर्त्यांना एवढेही गृहीत धरू नये! या प्रकारे वर्णन भाजपाने राज ठाकरे यांचे केले आहे. 
 
राज ठाकरे यांच्या नऊ जागांवर सभा होतील. यात बारामती, मावळ, नाशिक, नांदेड, सातारा, सोलापूर, उत्तर मुंबई, उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य मुंबई आदी लोकसभा मतदारसंघाची चर्चा आहे. चर्चेतील सर्व मतदारसंघ हे आघाडीच्या दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ आहेत.