शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2019 (17:04 IST)

जयदीप कवाडे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. संविधान बदलणं नवरा बदलण्याइतकं सोपं नसल्याचं म्हणत कवाडे यांनी इराणी यांना लक्ष्य केलं. ते नागपूर येथे माजी खासदार व काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
 
जयदीप कवाडे म्हणाले, ‘स्मृती इराणी संविधान बदलण्याची भाषा करतात, मात्र संविधान बदलणे नवरा बदलण्याइतके सोपे नाही.’ कवाडे यांच्या या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जयदीप कवाडेंचे भाषण संपल्यानंतर नाना पटोले यांनी कवाडेंना शाबासकी देत कौतुकही केले.